Virat Kohli: बस ड्रायव्हरलाही माहित्येय विराटला कसं बाद करायचं; हिमांशू सांगवानला दिलेला सल्ला अन् उडाला किंग कोहलीचा त्रिफळा

Himanshu Sangwan : रणजी करंडक स्पर्धेत विराट कोहली १२ वर्षानंतर खेळायला उतरला, परंतु तो फक्त १५ चेंडूंचा पाहूणा राहिला. वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवानने त्याचा अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवला.
virat Kohli himanshu Sangwan
virat Kohli himanshu Sangwaneskala
Updated on

Sangwan clean bowled Kohli in the first innings of the Ranji Trophy : रणजी करंडक स्पर्धेत विराट कोहलीची विकेट घेऊन रेल्वेचा वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवान प्रसिद्धी झोतात आला. दिल्लीविरुद्धच्या लढतीत हिमांशूने इनस्वींग चेंडूवर विराटला त्रिफळाचीत केले. त्याच्या गोलंदाजीवर फटका मारण्यासाठी विराट क्रिजपासून बराच पुढे उभा राहिला होता, परंतु तरीही हिमांशूने टाकलेल्या चेंडूने बॅट अन् पॅडमधून जागा शोधली व यष्टिंचा वेध घेतला. चेंडूचा वेग इतका होता की, यष्टिंनी दोन-तीन टप्पा खाल्ल्या.यानंतर विराटच्या चाहत्यांकडून हिमांशूला ट्रोल केले गेले, काहींनी चुकीच्या हिमांशूला सोशल मीडियावर शिव्या घातल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com