
Amir Jangoo century on ODI debut : वेस्ट इंडिजने तिसऱ्या वन डे सामन्यात बांगलादेशवर ४ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका ३-० अशी जिंकली. वेस्ट इंडिजने ३२२ धावांचे लक्ष्य पार करताना वन डेतील त्यांची तिसऱ्या सर्वोत्तम लक्ष्याचा पाठलाग केला आहे. या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या आमीर जांगू याने शतक झळकावले. ४६ वर्षांनंतर प्रथमच विंडीजच्या एखाद्या फलंदाजाने वन डे पदार्पणात शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.