Zimbabwe vs Afghanistan Test match result
esakal
Zimbabwe vs Afghanistan Test result: झिम्बाब्वे क्रिकेट संघाने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. झिम्बाब्वेने हा सामना एक डाव व ७३ धावांची जिंकला आणि कसोटी क्रिकेट इतिहासातील हा त्यांचा सर्वात मोठा विजय ठरला. अफगाणिस्तानचा संघ पाकिस्तानसाठी नेहमीच डोकेदुखी ठरलेला आहे, परंतु झिम्बाब्वेने त्यांना पराभूत करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या सामन्यात ब्लेसिंग मुझाराबानीने ( BLESSING MUZARABANI ) दोन्ही डावांत मिळून ६ विकेट्स घेतल्या आणि भारताच्या मोहम्मद सिराजचा विक्रम मोडला.