

Virat Kohli - Rohit Sharma | ICC ODI Rankings
Sakal
India ODI home and away matches 2026: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, वन डे मालिका आणि कसोटी मालिका... भारतीय संघासाठी हे वर्ष अत्यंत व्यग्र असणार आहे. सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जेतेपदक कायम राखण्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. २०२७ चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या वन डे मालिकांमध्ये संघबांधणीवर जोर असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma) व विराट कोहली ( Virat Kohli) या जोडीवर पुन्हा सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीत खणखणीत शतक झळकावताना निवड समितीला उत्तर दिले.