BCCI IPL 2025 profit and revenue model : इंडियन प्रीमिअर लीगचे १८ वे पर्व नुकतेच पार पडले... ३ जूनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवला.. १७ वर्षांच्या प्रयत्नानंतर RCB ला पहिले जेतेपद पटकावता आले. विराट कोहलीचा संघ फायनलमध्ये पोहोचल्याने स्पर्धेचा TRP पण वाढला होता आणि त्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCCI) आर्थिक फायदा झाला. पण, बीसीसीआयला जेवढा महसुल मिळाला, त्याच्या १ टक्केही वाटा विजेत्या RCB ला मिळालेला नाही.