'तू ज्यादा...'; या एका वाक्याने वैभव सूर्यवंशी पेटला, फायनलमध्ये श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप दिला, मॅचपूर्वी नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi fastest fifty in List A cricket: भारत अ संघाच्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने श्रीलंका अ विरुद्ध अंतिम सामन्यात अवघ्या 11 चेंडूत अर्धशतक ठोकत नवा विश्वविक्रम केला. प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकर यांच्या एका सल्ल्यामुळे त्याच्या फलंदाजीत मोठा बदल झाल्याचे वैभवने सांगितले.
Vaibhav Sooryavanshi fastest fifty in List A cricket

Vaibhav Sooryavanshi fastest fifty in List A cricket

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi fastest fifty in List A cricket: काल म्हणजेच २१ जून रोजी भारत अ संघ आणि श्रीलंका अ संघात तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात भारताच्या १५ वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीने(Vaibhav Sooryavanshi) धडाकेबाज फलंदाजी करत श्रीलंका संघाच्या गोलंदाजांना चांगलंच झोडपलं.

सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवण्याचं काम वैभव सूर्यवंशीने केलं. त्याने या सामन्यात अवघ्या ११ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावत नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com