हैदराबाद क्रिकेट असोसिएशन ( HCA) पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इंडियन प्रीमिअर लीग फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादसोबतचा वाद मिटतोय, तोच आता नवीन प्रकरण सुरू झाले आहे. हैदराबादमधील उप्पल येथील राजीव गांधी स्टेडियमच्या नॉर्थ पॅव्हेलियन स्टँडला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे ( Mohammed Azharuddin ) नाव देण्यात आले होते. पण, एचसीएला ते नाव काढून काढण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत. शिवाय क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांवरही अझरुद्दीनचे नाव न छापण्याचे निर्देश दिले गेले आहे. शनिवारी HCA चे नीतिमत्ता अधिकारी आणि लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरैया यांनी हा आदेश दिला.