मी अजूनची चांगल्या फॉर्मात आहे, मग भारतीय संघात पुनरागमनाची आशा का सोडू? मोहम्मद शमीचं विधान चर्चेत...

Mohammed Shami says he is still at his peak: भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने टीम इंडियात पुनरागमन करण्याची आशा अद्याप सोडलेली नाही. त्याच्या विधानाची क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली आहे.
Mohammed Shami

Mohammed Shami

Updated on: 

Mohammed Shami latest statement on India return: भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या तंदुरुस्तीवर आणि खेळण्याच्या पद्धतीवर होणाऱ्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बंगालच्या रणजी चषक सामन्यात सैन्यदलाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना शमीने स्पष्ट केले की, तो अजूनही त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून बाहेर बसलेल्या व्यक्तींनी त्याच्या स्पेलबाबत किंवा विश्रांतीबाबत निर्णय घेणे चुकीचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com