Video Viral : "मला २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, त्यामुळे शुभमन गिलला खूश ठेवावे लागेल", असं का म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma wants to play 2027 ODI World Cup: २०२७ चा वर्ल्ड कप खेळण्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरबाबत मजेशीर उत्तर दिले. गिलला खूश ठेवण्याच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला.
Rohit Sharma funny reply on Shubman Gill and Shreyas Iyer

Rohit Sharma funny reply on Shubman Gill and Shreyas Iyer

esakal

Updated on: 

Rohit Sharma funny reply on Shubman Gill and Shreyas Iyer: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या मजेशीर उत्तरामुळे चर्चेत आला आहे. रोहितने २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचेच आहे, हे आधीच स्पष्ट केले आहे, परंतु त्यासाठी त्याला शुभमन गिलला खूश ठेवावे लागेल, असेही तो म्हणाला. २०२७ चा वर्ल्ड कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते. त्यासाठी तो कठोर परिश्रम करत आहे. रोहितचा एक Video व्हायरल झाला आहे आणि त्यात तो म्हणतो की, मला २०२७ च्या वर्ल्ड कप खेळायचा आहे. त्यासाठी मला कर्णधार शुभमन गिलला खूश ठेवावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com