ICC increases Women’s World Cup 2025 prize money by 297 percent : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यामाने होणाऱ्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या बक्षीस रकमेची आयसीसीने आज घोषणा केली. आठ संघांच्या या स्पर्धेत एकूण बक्षीस रक्कम १३.८८ दशलक्ष (अमेरिकन डॉलर्स) असणार आहे आणि २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या मागील स्पर्धेच्या ३.५ दशलक्ष डॉलरच्या तुलनेत २९७ टक्क्यांनी अधिक आहे. ही एकूण बक्षीस रक्कम दोन वर्षांपूर्वी भारतात झालेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्प्रधेच्या १० दशलक्ष डॉलरच्या एकूण बक्षीस रकमेपेक्षा जास्त आहे.