India celebrate as they retain the No.1 position in ICC T20I team rankings
esakal
ICC annual team rankings latest update: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद राखणारा भारतीय संघ, हा जगातील पहिलाच संघ ठरला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आणि सलग दुसरा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नावावर केला. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र आहेत आणि अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वार्षिक ट्वेंटी-२० क्रमवारीत भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. मे २०२५ नंतर खेळलेल्या सर्व सामन्यांमधून १०० टक्के गुण व त्याआधीच्या दोन वर्षांत खेळलेल्या सामन्यांचे ५० टक्के गुण असे मिळून भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे.