

Champions Trophy 2025 Tournament format : आठ वर्षांनी होत असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी ही वन डे क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ट्वेंटी-२० च्या वाढत्या मागणीमुळे वन डे व कसोटी क्रिकेट मागे पडत चालल्याचे दिसतेय, परंतु मिनी वर्ल्ड कप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे वन डे क्रिकेटला नवसंजीवनी मिळण्याची अनेकांना अपेक्षा आहे. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड लढतीने चॅम्पियन्स ट्रॉफीला आजपासून सुरुवात होतेय आणि कराचीत हा सामना होतोय. तब्बल २९ वर्षांनी पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे, परंतु भारताचे सामने दुबईत होणार आहेत.