

Champions Trophy 2025: ICC May Shift Venue to Dubai After Pakistan’s Blunder
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला आता अवघी ४०-४४ दिवस शिल्लक राहिली आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातला तिढा सुटता सुटत नसल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) हायब्रिड मॉडेल मान्य केले आणि त्यानुसार भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवणार असल्याचे ठरले. पाकिस्तानमध्ये १० सामने होतील, परंतु आता त्यांच्या होण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय, अशी परिस्थिती उद्भवली आहे.