ICC Champions Trophy Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, भारत पाकिस्तानला देणार धक्का?

ICC Champions Trophy IND vs PAK : यावेळी पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवणार आहे.
champions trophy 2025 schedule ind vs pak
champions trophy 2025 schedule ind vs paksakal

ICC Champions Trophy IND vs PAK : यावेळी पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे यजमानपद भूषवणार आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) पाठवले आहे.

मात्र, आयसीसीने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही. पीसीबीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 1 मार्च रोजी लाहोरमध्ये होणार आहे.

याबाबत पीसीबीने सांगितले होते की, सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाला आपले सर्व सामने लाहोरमध्ये खेळावे लागणार आहेत. आता याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ज्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो.

champions trophy 2025 schedule ind vs pak
Rohit Sharma : जय शाहांची पुन्हा भविष्यवाणी; म्हणाले, रोहित शर्मांच्या नेतृत्वात भारत WTC अन् चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल

प्रसारमाध्यमांशी बोलताना बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणे शक्य नाही, मात्र याबाबत अद्याप फारशी चर्चा झालेली नाही. टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर गेल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार घेईल. ज्याचे पालन करावे लागेल.

champions trophy 2025 schedule ind vs pak
INDW vs SAW: भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; दुसऱ्या T20 मध्ये आज दक्षिण आफ्रिकेशी लढत

याआधीही टीम इंडियाने आशिया कप दरम्यान पाकिस्तानला भेट दिली नव्हती. गेल्या वर्षी आशिया कपचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारतीय संघाने आपले सामने श्रीलंकेत खेळले, कारण सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली नाही.

खरं तर, भारत आणि पाकिस्तानमधील खराब राजकीय संबंधांमुळे, दोन्ही देशांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. सध्या हे दोन संघ केवळ वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसतात. या दोन संघांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com