
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये एक नवा नियम आणला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे पॉवर प्लेमध्ये हा बदल होणार आहे. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील एखादा सामना पावसामुळे किंवा अन्य दुसऱ्या कारणामुळे कमी षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला, तर पॉवर प्लेच्या षटकांची संख्या नवीन नियमानुसार कमी होणार आहे. पण, यापूर्वी षटकांची संख्या कमी केली जात होती, परंतु आता ३० टक्के नियमानुसार चेंडूंचीही संख्या कमी होणार आहे.