ICC ODI Ranking : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रतेसाठी चढाओढ; टीम इंडियासाठी महत्त्वाची बातमी... पाकिस्तानला धक्का, बांगलादेश पुन्हा ICC स्पर्धेला मुकणार

ICC ODI rankings latest update Team India number one: आयसीसी वन डे क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम असून २०२७ वन डे वर्ल्ड कपच्या थेट पात्रतेची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे हे यजमान देश असल्यामुळे त्यांना स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे. मात्र...
ICC ODI rankings latest update Team India number one

ICC ODI rankings latest update Team India number one

esakal

Updated on

दरम्यान, आयर्लंडने (५४) झिम्बाब्वेला (५३) मागे टाकत ११ वे स्थान पटकावले आहे, तर अमेरिकेने स्कॉटलंडला मागे टाकत १३ व्या स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेने ४६ गुणांसह स्कॉटलंडच्या ४४ गुणांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. संयुक्त अरब अमिरातीनेही १६ गुणांसह कॅनडाला मागे टाकत १९ वे स्थान मिळवले आहे.

२०२७ ची वन डे वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२७ मध्ये खेळवली जाईल. २००३ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा आफ्रिका खंडात परतत आहे. यावेळी संघसंख्या १० वरून वाढवून १४ करण्यात आली आहे. आयसीसीच्या ३१ मार्च २०२७ च्या क्रमवारीतील अव्वल ८ संघ थेट पात्र होतील. उर्वरित ४ जागांसाठी पात्रता फेरीत सामने होतील. नामिबिया यजमान असूनही त्यांना पात्रता फेरीतून यावे लागेल.ODI World Cup 2027 direct qualification rules explained: भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. भारतीय संघाने दुसऱ्या स्थानावरील न्यूझीलंडवर (११३ गुण) केवळ पाच गुणांची आघाडी घेतली आहे, तर ऑस्ट्रेलियाने (१०९ गुण) तिसरे स्थान कायम राखले आहे. भारताची रेटिंग एका अंकाने किंचित घसरली असून, आता त्यांच्या नावावर ११८ गुण आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com