Virat Kohli loses No 1 ODI ranking: न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचे वन डे फलंदाजांमधील अव्वल स्थान निसटले आहे. न्यूझीलंडचा स्टार फलंदाज डॅरिल मिचेल ( Daryl Mitchell ) हा नंबर वन फलंदाज बनला आहे. विराटची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. हिटमॅन रोहित शर्मालाही धक्का बसला आहे.