ICC ODI World Cup 2027 Schedule Announced
ICC ODI World Cup 2027 Schedule Announced: दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या स्पर्धेत १० ऐवजी १४ संघ सहभाग घेणार आहेत आणि त्यामुळे स्पर्धा फॉरमॅटमध्येही बदल करण्यात आलेला आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांचा हा शेवटचा वन डे वर्ल्ड कप असल्याने, त्यांच्या हातात ट्रॉफी पाहण्याची तमाम भारतीयांची इच्छा आहे. २०२३ मध्ये फायनलला पराभूत झाल्याने रोहितचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. यावेळेस तो ते पूर्ण करण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरेल. २ ऑक्टोबर २०२७ पासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत.