ICC corrects Virat Kohli ODI ranking error
esakal
ICC blunder on Virat Kohli rankings explained: विराट कोहलीने आयसीसी वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत चार वर्षांनंतर अव्वल स्थान पटकावले. पण, आयसीसीने याची घोषणा करताना एक मोठी चूक केली होती आणि चाहत्यांनी ती लक्षात आणून दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला त्यात सुधारणा करावी लागली. भारत-न्यूझीलंड पहिल्या वन डे सामन्यात विराटने ९३ धावांची खेळी केली होती आणि जुलै २०२१ नंतर वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. आयसीसीने जाहीर केलेल्या या बातमीत सर्वाधिक काळ वन डे फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर राहणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट ८२५ दिवसांसह दहाव्या क्रमांकावर होता.