ICC Discussing Ball Change, Coach Access During Match
esakal
ICC discussion on coach entering field during drinks break: क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय फॉरमॅट असलेल्या ट्वेंटी-२० क्रिकेटला अधिक रंजक आणि वेगवान बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) काही क्रांतिकारी बदल करण्याच्या तयारीत आहे. आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या (CEC) आगामी बैठकीत चेंडूचा रंग, डावातील ब्रेकची वेळ आणि इतर नियमांमध्ये बदल करण्याबाबत महत्त्वाचे प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. ही बैठक अहमदाबाद येथे ३० मे रोजी होणार आहे.