Salman Ali Agha: वर्ल्डकप तिकीट विक्रीच्या पोस्टरवरून सलमानला वगळले; पाकिस्तान क्रिकेट मंडळ ‘आयसीसी’वर नाराज
PCB Upset Over ICC T20 World Cup Promotional Poster: आशियाई करंडकानंतर आता टी-२० विश्वकरंडकाआधीही पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भारत व श्रीलंका या देशांमध्ये पुढल्या वर्षी विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येत आहे.
कराची : आशियाई करंडकानंतर आता टी-२० विश्वकरंडकाआधीही पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भारत व श्रीलंका या देशांमध्ये पुढल्या वर्षी (२०२६, फेब्रुवारी-मार्च) टी-२० विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येत आहे.