ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

England Women vs Sri Lanka Women record highlights: आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या उद्घाटन सामन्यात इंग्लंड महिला संघाने श्रीलंका महिला संघावर दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. एडजबॅस्टन येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंनी सर्वच विभागांत वर्चस्व गाजवले आणि विजयासोबतच अनेक विक्रमांची नोंद झाली.
England Women dominant win over Sri Lanka Women

England Women dominant win over Sri Lanka Women

ESAKAL

Updated on

ICC Women's T20 World Cup 2026 opening match records: यजमान इंग्लंडने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेवर ८७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. डॅनी वॅट-हॉजचे नाबाद शतक अन् एमी जोन्स व नॅट शिव्हर ब्रंटसोबतच्या विक्रमी भागीदारीनंतर फ्रेया केम्पच्या अचूक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या संघाने शरणागती पत्करली. या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले गेले. त्यात भारताचा विक्रमही मोडला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com