Jemimah Rodrigues gets emotional after India’s victory
esakal
India women qualify for ICC World Cup final 2025 : भारतीय महिला संघाने ऐतिहासिक विजयासह महिला वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनल गाठली. भारतीय संघ ३३९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करेल, असे ऑस्ट्रेलियाच्या कधी ध्यानी मनी नव्हते. पण, जेमिमा ( Jemimah Rodrigues, Player of the Match) व हरमनप्रीत कौर यांनी ते शक्य करून दाखवले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हा सर्वात मोठा लक्ष्याचा यशस्वी पाठलाग ठरला. या विजयानंतर जेमिमाने पहिले आभार मानले ते जिजसचे...