ICC ODI World Cup new format explained
esakal
Why four countries oppose ICC World Cup format? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) २०२७ चा वन डे वर्ल्ड कप आणि २०२८ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फॉरमॅटमध्ये बदलाची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. जय शाह प्रमुख असलेल्या आयसीसीने घेतलेल्या या निर्णयावर आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे. विशेषतः वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये केलेल्या बदलाविरोधात चार देश उभे राहिले आहेत. या नव्या फॉरमॅटमुळे आयसीसी अधिकचा महसूल कमवू शकेल, परंतु त्यांचा हा निर्णय संलग्न संघटनांना धक्का देणारा ठरू शकतो. या वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता मिळवण्यासाठी वर्षभर मेहनत करणाऱ्या या संलग्न देशांनी आवाज उचलला आहे. या स्पर्धेत आता १४ ऐवजी १२ संघ खेळणार आहेत.