भारत-पाकिस्तान यांच्यातलं वाढतं तणाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धेत सहभाग घेणार नसल्याचे वृत्त समोर आले होते. आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) प्रमुखपद मोहसिन नक्वी यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच टीम इंडिया हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. पण, BCCI चे सचिन देवाजित सैकिया यांनी अशी कोणतीच चर्चा नसल्याचे स्पष्ट केले आणि ते वृत्त खोटं असल्याचे म्हटले. पण, तरी समजा जर भारताने Asia Cup 2025 स्पर्धेतून माघार घेतलीच, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ( PCB) भीक मागण्याची वेळ येईल.. ते कसं, जाणून घेऊयात...