
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा उपांत्य सामना मंगळवारी सुरू आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात विजय मिळवणारा संघ तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकणार आहे. या दोन्ही संघांनी यापूर्वी प्रत्येकी दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
या दोन्ही संघात आत्तापर्यंत अनेकदा चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातही चुरस पाहायला मिळण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. या सामन्यापूर्वी अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून आता आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभस सिंह यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.