
India vs Australia Boxing Day Test: पहिल्या कसोटीत दारुण पराभवाचा सामना केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने कमालीची प्रगती करीत दुसरा सामना जिंकला. मालिकेत १-१ बरोबरी साधली. अशीच प्रगती भारताला चौथ्या कसोटी सामन्यासाठी करावी लागणार आहे. फलंदाजीत सुधारणा हाच एक राजमार्ग भारतीयांसमोर आहे.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला तग धरून राहायला ऑस्ट्रेलियाच्या तीन दर्जेदार वेगवान गोलंदाजांसमोर उभे राहणे गरजेचे होते. मालिका चालू झाल्यापासून तीन कसोटींत झालेल्या पाचपैकी फक्त एका डावात भारतीय फलंदाजांना सूर गवसला आहे.