
Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याचा फॉर्म हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. लोकेश राहुल व यशस्वी जैस्वाल यांनी सलामीला काही चांगल्या भागीदारी केल्याने रोहितने सहाव्या क्रमांकावर खेळण्याचे ठरवले. पण, त्यानंतरही त्याला अपेक्षित सूर गवसलेला नाही आणि मेलबर्न कसोटीसाठी तयारी करत असताना तो देवदत्त पडिक्कलच्या गोलंदाजीवर बाद झाल्याने चर्चेला आणखी तोंड फुटले आहे.