IND A vs NZ A live score KL Rahul and Yashasvi Jaiswal fail
esakal
India A batting collapse against New Zealand A in unofficial Test: भारताच्या कसोटी संघातील स्टार फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) व यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) यांनी पुन्हा एकदा निराश केले. भारत अ संघाचा पहिला डाव ११३ धावांवर गुंडाळून न्यूझीलंड अ संघाने ३१७ धावा करून २०४ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात भारताकडून सडेतोड उत्तर अपेक्षित होते, परंतु लोकेश व यशस्वी अवघ्या १० धावा फलकावर असताना माघारी परतले.