IND A vs NZ A Test: देवदत्त पडिक्कलची १९९ धावांवर विकेट ढापली! भारतीय फलंदाज अम्पायरवर संतापला, नेमकं काय घडलं? Video

Devdutt Padikkal Misses Double Century By Just One Run: भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील अनधिकृत कसोटी सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या विकेटवरून वाद निर्माण झाला आहे.
Devdutt Padikkal dismissed for 199 against New Zealand A

Devdutt Padikkal dismissed for 199 against New Zealand A

esakal

Updated on: 

Devdutt Padikkal's 199-Run Masterclass Ends In Controversy: भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात न्यूझीलंड अ संघाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावला. पहिला डाव ११३ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंड अ संघाचे गोलंदाज हवेत होते, परंतु भारत अ संघाने दुसऱ्या डावात त्यांना जमिनीवर आणले. देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, यश राठोड, वॉशिंग्टन सुंदर, अंशूल कंबोज व आकिब नबी यांनी किवी गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, एका वादग्रस्त निकालाने सामना गाजला. १९९ धावांवर खेळणाऱ्या देवदत्तला अम्पायरने झेलबाद दिले आणि त्याचे द्विशतक हुकले. या निर्णयावर नाराज झालेल्या देवदत्तने अम्पायरकडे आश्चर्याने पाहिले. या सामन्यात DRS नसल्याने देवदत्तला निर्णय मान्य करून माघारी जावे लागले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com