Tanmay Baloda 14 wickets against Australia U19
esakal
India U19 won by 10 wickets against Australia U19: भारतीय क्रिकेट वर्तुळात सध्या विजयाचे वारे वाहत आहेत. मंगळवारी भारताने ट्वेंटी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केले आणि त्याचवेळी भारत अ संघानेही वन डे सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाचा पराभव केला. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने ही विजयी मालिका कायम राखताना बुधवारी ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धची दुसरी कसोटी ५ चेंडूंत जिंकली. तन्मन बलोडा ( Tanmay Baloda ) ने दोन्ही डावांत मिळून १४ विकेट्स घेतल्या आणि भारतासमोर विजयासाठी केवळ ११ धावांचे लक्ष्य कांगारूंना ठेवता आले. भारताने ही मालिका २-० अशी खिशात घातली.