Will rain affect India vs Afghanistan match today
esakal
Dharamsala weather update for IND vs AFG ODI: भारत-अफगाणिस्तान, यांच्यातल्या वन डे मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी या मालिकेतून सुरू होणार आहे आणि त्यामुळेच दोन्ही संघांसाठी ती महत्त्वाची आहे. भारतीय संघ विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, आदी सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थिती या मालिकेत मैदानावर उतरणार आहे. त्यामुळेच नव्या दमाच्या खेळाडूंच्या तयारीची चाचपणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. असे असले तरी धर्मशाला येथे होणारा पहिल्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट तयार झाले आहे.