IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Why Mohammed Shami was dropped from India squad? भारत विरुद्ध अफगाणिस्तान २०२६ मालिकेसाठी बीसीसीआयने कसोटी आणि वनडे संघाची घोषणा केली, मात्र अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुन्हा एकदा दोन्ही संघांमध्ये स्थान मिळाले नाही.
Ajit Agarkar explains Mohammed Shami’s exclusion

Ajit Agarkar explains Mohammed Shami’s exclusion

esakal

Updated on

Ajit Agarkar on Mohammed Shami exclusion: इंडियन प्रीमिअर लीगनंतर होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. या मालिकेची सुरुवात ६ जून रोजी एकाच कसोटी सामन्याने होणार आहे. निवड समितीने आगामी मालिकेसाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले करताना पुन्हा एकदा मोहम्मद शमीकडे काणाडोळा केला. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजाकडे दुर्लक्ष केले आणि त्याला दोन्ही संघांमध्ये स्थान देऊ शकली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com