IND vs AFG 2nd ODI: यशस्वी जैस्वालचे पुनरागमन, मग रोहित शर्मा संघाबाहेर झाला का? टीम इंडियात ३ बदल, प्रिन्स यादवचे पदार्पण

India vs Afghanistan, 2nd ODI Marathi News:भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या वन डे सामन्यात दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. भारताच्या संघात तब्बल तीन बदल करण्यात आले असून युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला वन डे पदार्पणाची संधी मिळाली आहे.
India playing XI for 2nd ODI against Afghanistan

India playing XI for 2nd ODI against Afghanistan

Updated on

India vs Afghanistan, 2nd ODI Marathi Update: भारत-अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा वन डे सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जातोय. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि आजचा सामना जिंकून विजयी आघाडी घेण्याचा यजमानांचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रयोग होण्याची शक्यता फार कमी होती. २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे आणि रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागून आहे. अफगाणिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com