

IND vs AFG 2nd ODI
esakal
IND vs AFG 2nd ODI: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज लखनऊच्या एकना मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनेही हा सामना भारतीय संघासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.