IND vs AFG 2nd ODI: वर्ल्ड कपच्या तयारीसाठी गिलचा 'मास्टर प्लॅन'; दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग ११ मध्ये होणार २ मोठे बदल

India Eye Series Win Against Afghanistan IND vs AFG 2nd ODI: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या वनडेत टीम इंडिया दोन मोठे बदल करू शकते. शुभमन गिलने विश्वचषकाच्या तयारीसाठी नवीन कॉम्बिनेशनवर लक्ष असल्याचे सांगितले.
IND vs AFG 2nd ODI

IND vs AFG 2nd ODI

esakal

Updated on

IND vs AFG 2nd ODI: भारत आणि अफगाणिस्तान(IND vs AFG) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना धर्मशाळा येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ७ गडी राखून पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने शानदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. शनिवारी झालेल्या या सामन्यात भारताने सहज विजय मिळवत मालिकेची दमदार सुरुवात केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com