

Rohit Sharma availability for IND vs AFG ODI series? अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आता वन डे मालिकेसाठी सज्ज होत आहे. १३ जूनपासून वन डे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या या मालिकेपूर्वी भारतीय संघाला दिलासादायक बातमी मिळाली आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याला तंदुरूस्त म्हणून सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ( CoE) स्पोर्ट्स सायन्स टीम घोषित केले आहे. त्यामुळे धर्मशाला येथे होणाऱ्या वन डे सामन्यातून पुनरागमन करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. हार्दिक मार्च २०२५ नंतर वन डे सामना खेळलेला नाही.