Gautam Gambhir’s decision to promote Harshit Rana and drop Arshdeep Singh
esakal
Australia vs India 1st T20I Marathi News : वन डे मालिकेत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या निर्धाराने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया ऑस्ट्रेलियाचा सामना करायला मैदानावर उतरली आहे. पण, सूर्यकुमार यादवच्या ( Captain Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला सामन्यापूर्वीच मोठा धक्का बसला. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी ( Nitish Kumar Reddy ) याला दुखापतीमुळे पाच सामन्यांच्या मलिकेतील पहिल्या तीन सामन्यांना मुकावे लागले आहे. पण, या सामन्यात हर्षित राणा ( Harshit Rana) याचं सिलेक्शन पुन्हा चर्चेत आलं आहे.