AUS vs IND 2nd T20I Live Marathi News
esakal
India vs Australia 2nd T20I Marathi Cricket Update: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला ट्वेंटी-२० सामना पावसामुळे रद्द झाला आणि आज दुसरा सामना मेलबर्नवर खेळवला जाणार आहे. ९० हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियमवर होणारा सामना पाहण्यासाठी तुडूंब गर्दी होण्याची अपेक्षा आहे, परंतु याही सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे चाहत्यांची निराश होऊ शकते. भारताने येथे खेळलेल्या सहा ट्वेंटी-२० पैकी चारमध्ये विजय मिळवला आहे. जसप्रीत बुमराहला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त विकेट्सचे शतक पूर्ण करण्यासाठी चार बळी आवश्यक आहेत. तर संजू सॅमसन ( ७ धावा) व तिलक वर्मा ( ३८ धावा) यांना ट्वेंटी-२०त १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे.