shubman gill
shubman gillesakal

IND vs AUS 2nd Test: मिचेल स्टार्कच्या 'बनाना स्विंग'ने Shubman Gillचा त्रिफळा उडवला; भारताचा निम्मा संघ गारद केला Video

Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या कसोटीत पूर्णपणे वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळत आहे. ट्रॅव्हिस हेडच्या शतकानंतर ऑसी गोलंदाजांनी पुन्हा एकदा भारतावर दडपण निर्माण केले आहे.
Published on

Shubman Gill bowled Mitchell Starc: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामन्याचा निकाल तीन दिवसात लागतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताचा पहिला डाव १८० धावांवर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावातही दादागिरी दिसतेय. दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी १०५ धावांवर तंबूत पाठवला आहे. मिचेल स्टार्कच्या भन्नाट बनाना स्विंगने शुभमन गिलचा उडवलेला त्रिफळा अविश्वसनीय होता. त्यात पॅट कमिन्सने एकदम सहजतेने रोहित शर्माचा ऑफ स्टम्प उडवून भारताला अडचणी आणले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com