
Rohit Sharma give update on his Retirement:
भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी ड्रॉ राहिल्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अजूनही १-१ अशी बरोबरीत आहे. या सामन्यानंतर महान अष्टपैलू खेळाडू आर अश्विन ( R Ashwin ) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अश्विन दुसऱ्या कसोटीत खेळला होता, परंतु गॅब्बासाठी रवींद्र जडेजाला संधी दिली गेली. ही कसोटी सुरू असताना त्याचा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यात तो भावनिक दिसला. तेव्हाच त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अखेर त्याने तो निर्णय जाहीर केला. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माच्याही ( Rohit Sharma) निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यावर कॅप्टनने स्पष्ट मत मांडले.