
India vs Australia 4th Test: भारतीय क्रिकेट संघाला पर्थ कसोटी सामना जिंकल्यानंतर ॲडलेड कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिली. येत्या २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
सध्या तरी भारतीय संघात बदलाचे संकेत कमी आहेत, मात्र यशाचा मार्ग शोधून काढायचा असल्यास संघापेक्षा खेळामध्ये बदल करण्याचा संदेश जाणकारांकडून देण्यात आला आहे.
कोणताही कसोटी सामना चालू होण्याअगोदर संघात कोण खेळणार आणि खेळपट्टी कशी असणार याची चर्चा होत असते. आता सरावादरम्यान भारतीय फलंदाज दाखवत असलेला संयमाचा बदल प्रत्यक्ष सामन्यात जसाचा तसा उतरेल का, असा सवाल मनात पिंगा घालतो आहे.