
IND vs AUS Five Indian Batter Injured: भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत असताना मेलबर्न कसोटीसाठी भारतीय संघ नेट्समध्ये जोरदार तयारी करत आहे. पण भारतीय चाहत्यांसाठी दुख:द बातमी आहे. सरावादरम्यान भारताच्या महत्वाच्या ५ शिलेदारांना दुखापत झाली असल्याचे समोर येत आहे. ज्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल व सलामीवीर केएल राहुल, यशस्वी जैस्वाल व आकाश दीपचा समावेश आहे.