
Rohit informed his decision to coach Gautam Gambhir, Ajit Agarkar
भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटीत नेतृत्व करणार आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार रोहितने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना पाचव्या कसोटीसाठई त्याची निवड करू नका, असे सांगितले आहे. या दोघांनी सहमती दर्शवली आहे.