
Sydney Test Weather Report : भारतीय संघ उद्या, ३ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर गावस्कर मालिकेतील अंतिम कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदावानावर खेळवण्यात येणार आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना गमावल्यानंतर भारतीय संघ मालिकेत २-१ ने पिछाडीवर गेला आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे गरजेचे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनच्या दृष्टीने देखील हा सामना महत्त्वाचा आहे.