8 major coincidences between 2015 World Cup and 2025 Champions Trophy : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या लढतीची सर्वांना उत्सुकता आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आतापर्यंत अपराजीत आहे, तर ऑस्ट्रेलियाने १ विजय व दोन अनिर्णीत ( पावसामुळे रद्द) निकालाच्या जोरावर उपांत्य फेरी गाठली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाच्या ६ प्रमुख खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत जाण्याची शक्यताही नव्हती. पण, नव्या दमाच्या खेळाडूंसह त्यांनी जोर लावला आणि आता ते टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत.