
IND vs AUS 2nd Test : अॅडिलेडवरील खेळपट्टी गोलंदाजांना फायदेशी ठरेल असे सांगितले जात होते आणि तसेच झाले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण गुलाबी चेंडूच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजी गंडली. नितीश कुमार रेड्डीने फटेबाजी करून धावा जमा करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी मिचेल स्टार्क आजच्या दिवसाचा हिरो ठरला. त्याला भारताचे ६ फलंदाज तंबूत पाठवण्यात यश आले. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी मात्र घरच्या मैदानावरील अनुभवाचा फायदा उचलत फलंदाजीमध्ये चांगली लय पकडली.