IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Jasprit Bumrah 5 Wickets : पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स पूर्ण करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Jasprit Bumrah 5 wickets haul
Jasprit Bumrah | India vs Australia TestSakal
Updated on

Australia vs India Test Series: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शुक्रवारपासून (२२ नोव्हेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही संघांचे मिळून १७ विकेट्स गेल्या होत्या.

भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहने पहिल्याच दिवशी ४ विकेट्स घेत प्रभावी कामगिरी बजावली होती. त्याने आता या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही सुरुवात शानदार करत मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली.

Jasprit Bumrah 5 wickets haul
IND vs AUS : पर्थ कसोटीत अनुभवी फिरकीपटूंना वगळून Washington Sundar ला संधी; अश्विन अन् जडेजाला वगळण्याचे नेमकं कारण काय ?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com