
IND vs AUS 2nd Test : भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटीत अंपायर्सचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला आणि त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवून खेळाडूही आपली विकेट टाकायला राजी झाले. पहिल्या डावात ज्याप्रमाणे अंपायरन निर्णय कळवल्यावर केएल राहुल मैदानातून बाहेर जाण्यास निघाला ऑस्ट्रेलियाच्या डावातही तेच पाहायला मिळाले. तो चेंडू नो असल्यामुळे राहुलाचा विकेट वाचला. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श मात्र फसला. त्याने रिव्ह्यू न घेता स्वत:ला बाद समजले आणि मैदानाबाहेरचा रस्ता धरला.