
IND vs AUS : आखूड टप्प्याचे चेंडू अगोदच ओळखण्याची हुशारी ट्रॅव्हिस हेडच्या भारताविरुद्धच्या मालिकेत मोलाची ठरत आहे. भारतासाठी तो मोठी डोकेदुखी ठरत ठरतोय, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या गावसकर-बॉर्डर मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत हेडने ८९, १४० आणि १५२ अशा खेळी केल्या आहेत. प्रकाशझोतातील सामन्यात त्याची १४० धावांची खेळी भारताच्या पराभवास प्रमुख कारणीभूत ठरली होती.